तिघांना सुनावली दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:29+5:302021-03-05T04:32:29+5:30

गाडीवरून घसरल्याने एकाचा हात मोडला उमरगा : दुचाकीवरून घसरल्याने एकाच्या हाताचे हाड मोडल्याची घटना चिंचोली (ज) येथे १ मार्च ...

All three were sentenced | तिघांना सुनावली दंडाची शिक्षा

तिघांना सुनावली दंडाची शिक्षा

googlenewsNext

गाडीवरून घसरल्याने एकाचा हात मोडला

उमरगा : दुचाकीवरून घसरल्याने एकाच्या हाताचे हाड मोडल्याची घटना चिंचोली (ज) येथे १ मार्च रोजी घडली. कर्नाटकातील आळंद येथील बंड्या शिवया मठपती यांनी चिंचोली (ज) येथील रस्त्यावर त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्र. के.ए.- २८ एम.- ९०७४) ही निष्काळजीपणे चालविली. यामुळे दुचाकी घसरून पाठीमागे बसलेले गिरीश उमाकांत पाटील यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. याप्रकरणी गिरीश पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दगड उचलण्यावरून तिघांना केली मारहाण

लोहारा : भूखंडावर टाकलेले दगड उचलण्याच्या वादातून पत्नी-पत्नीसह मुलास मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील वडगाव येथे घडली. वडगाव येथील शिवाजी कुंभार यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलास गुंडू कुंभार व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी भूखंडावर टाकलेले दगड उचलण्याच्या वादातून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिवाजी कुंभार यांनी २ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेरकर यांचे यश

उस्मानाबाद : येथील अभिनव इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका रजनी राजाभाऊ शेरकर यांना ‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ. नीळकंठ पाटील, डॉ. महेश्वर कळलावे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: All three were sentenced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.