खून प्रकरणातील पाचही आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:35 IST2021-04-23T04:35:43+5:302021-04-23T04:35:43+5:30

उमरगा : शहरातील काळे प्लॉट येथील पालिकेच्या मार्केट शेजारी बुधवारी एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी ...

All five accused in the murder case are missing | खून प्रकरणातील पाचही आरोपी गजाआड

खून प्रकरणातील पाचही आरोपी गजाआड

उमरगा

: शहरातील काळे प्लॉट येथील पालिकेच्या मार्केट शेजारी बुधवारी एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली होती. उर्वरित दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उमरगा शहरातील मुळज रोड भागात घडलेल्या आकाश आबाचणे याच्या खून प्रकरणी लहान भाऊ राजेंद्र अबाचणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत रोहित चुंगे, आकाश धोत्रे, व्यकंट धोत्रे, प्रशांत पुरातले (सर्व रा.उमरगा) व विकास जाधव (रा.तुरोरी) यांच्याविरूध्द उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी तपास अधिकारी यांनी व्यंकट धोत्रे, विकास जाधव व प्रशांत पुरातले यांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा रोहित चुंगे, आकाश धोत्रे यांना शहरातूनच ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता पाचही आरोपीना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पाच आरोपींपैकी प्रमुख आरोपी आकाश धोत्रे हा कोरोना पॉझिटिव्ह असून, त्याला उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासिक अधिकारी सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी सांगितले.

Web Title: All five accused in the murder case are missing