धानुरीत सर्वपक्षीयांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:11+5:302021-02-11T04:34:11+5:30
(फोटो : धानुरी १०) धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रवीण अशोक थोरात, तर उपसरपंचपदी विठ्ठल केशव बुरटुकणे ...

धानुरीत सर्वपक्षीयांचा जल्लोष
(फोटो : धानुरी १०)
धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रवीण अशोक थोरात, तर उपसरपंचपदी विठ्ठल केशव बुरटुकणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड.दीपक जवळगे यांच्या नेतृत्वाखालील धानुरी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध काढण्यात आली. सोमवारी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी झालेल्या बैठकीत सरपंचपदासाठी प्रवीण अशोक थोरात व उपसरपंचपदासाठी विठ्ठल केशव बुरटुकणे या दोघांचेच अर्ज दाखल झाले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या निवडीनंतर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड.दीपक जवळगे यांनी नूतन सरपंच व उपसरपंच यांच्यासह सदस्य सचिन तिगाडे, गणेश जाधव, राम पाटील, स्मिता साळुंके, कविता बनकर, सुनीता राठोड, सत्वगुणी जाधव, सारिका राठोड, गीतांजली वडजे यांचा सत्कार केला. यावेळी प्रा.तानाजी पवार, श्रीकांत जाधव, संभाजी वडजे, सुधीर थोरात, किशोर बुरटुकणे, खंडू साळुंके आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एम. जंगम व सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रदीप जाधव यांनी काम पाहिले.