कृषी अवजार बँक, बागांची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:25+5:302021-02-05T08:14:25+5:30
फोटो (२९-१) राहुल डोके पारगाव : वाशी तालुक्यातील लोणखस येथे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व जिल्हा ...

कृषी अवजार बँक, बागांची केली पाहणी
फोटो (२९-१) राहुल डोके
पारगाव : वाशी तालुक्यातील लोणखस येथे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व जिल्हा प्रक्षेत्र भेट कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी शिवशक्ती शेतकरी गटाने कृषी विभागाच्या साहाय्याने बनविलेल्या कृषी अवजार बँकेची तसेच येथील ऊस रोपवाटिका, डाळिंब फळबाग लागवड, केळी फळबागेची पाहणी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी केली.
या कृषी अवजार बँकेत नांगरणी, मोघडणी, बीबीएफ पेरणी यंत्र, पाचरट कुट्टी, मळणी यंत्रासह इतर अवजारे असून, ती शेतकऱ्यांना कमी दराने वापरासाठी मिळणार आहेत. यावेळी रुई येथील संपत संभाजी उंदरे यांच्या लोणखस शिवारातील शेतात ऊस रोपवाटिकेस व डाळिंब, केळी फळबाग व हरभरा पिकास भेट देऊन अधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी यू. आर. घाटगे, व्ही. पी. सूर्यवंशी, एस. एल. सूर्यवंशी, गणेश मंडलिक, डॉ. एस. एन. झगडे, शेतकरी संभाजी उंदरे, पांडुरंग उंदरे, धनंजय उंदरे, नामदेव घाडगे, आटुळे, विकास सोन्ने, सिकंदर पवार आदींची उपस्थिती होती.