५०० रुपयांची लाच स्वीकारणारी कृषी सहायक महिला ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:44+5:302021-03-07T04:29:44+5:30
तक्रारदाराने पोक्रा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) अंतर्गत तुषार सिंचन या गटासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. या ...

५०० रुपयांची लाच स्वीकारणारी कृषी सहायक महिला ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
तक्रारदाराने पोक्रा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) अंतर्गत तुषार सिंचन या गटासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. या कामाची पाहणी करून तुषार सिंचन अनुदानाचे मागणीपत्र घेऊन सिंचन सेट खरेदी केलेचा अहवाल शासनास पाठविण्यासाठी रुईभर सज्जाच्या कृषी सहायक रंजना मुंडे यांनी तक्रारदाराकडे १ हजार रुपये लाच रकमेची मागणी करून ५०० रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्ष अनिता जमादार, उस्मानाबाद लाचचुलपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. या कामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकर शेख, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक इरफान पठाण यांनी मदत केली. याबाबत बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.