उमरग्यात ५८ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST2021-04-16T04:33:16+5:302021-04-16T04:33:16+5:30

मुरूम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या ३३ रॅपिड अँटीजेन टेस्टपैकी २ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील ग्रामीण भागात १७५ ...

Age increased to 58 patients | उमरग्यात ५८ रुग्ण वाढले

उमरग्यात ५८ रुग्ण वाढले

मुरूम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या ३३ रॅपिड अँटीजेन टेस्टपैकी २ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील ग्रामीण भागात १७५ रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १४ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या १३७ रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, ९ स्वॅबच्या अहवालातून दोघे बाधित आढळले. सध्या तालुक्यात ३६८ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी उपजिल्हा रुग्णालयात १०६, ईदगाह कोरोना केअर सेंटरमध्ये २९, खाजगी रुग्णालयात २३, मुरूम कोविड केंद्रात ६७ तर होम आयसोलेशनमध्ये ५२ रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके व वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे यांनी दिली.

Web Title: Age increased to 58 patients