मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:53+5:302021-01-18T04:29:53+5:30
तालुक्यातील आरणी, तावशीगड, धानुरी, राजेगाव व मार्डी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, २१ ग्रामपंचायतच्या निवडून द्यावयाच्या १३८ जागेसाठी ...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
तालुक्यातील आरणी, तावशीगड, धानुरी, राजेगाव व मार्डी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, २१ ग्रामपंचायतच्या निवडून द्यावयाच्या १३८ जागेसाठी शुक्रवारी ७७.३३ टक्के मतदान झाले. यात १२ हजार ६६ पुरूष तर १० हजार ५६२ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. १० टेबलवर होणाऱ्या या मतमोजणीसाठी ५० कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत १० टेबलवर दस्तापूर, भातागळी, चिंचोली काटे, होळी, एकोंडी (लो.), लोहारा खुर्द, करजगाव, करवंजी, कास्ती (बु.), कास्ती खुर्द या १० गावांची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत मुर्शदपूर, मोघा (बु.), हिप्परगा सय्यद, बेलवाडी, भोसगा येथील मतमोजणी होणार आहे. आष्टाकासार व कानेगाव येथे पाच मतदान केंद्र असल्याने दुसऱ्या फेरीत प्रत्येकी तीन-तीन मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे. शेवटच्या तिसऱ्यात फेरीत कोंडजीगड, हराळी, उदतपूर, फणेपूर, आष्टाकासार, कानेगाव येथील राहिलेल्या प्रत्येकी दोन-दोन मतदान केंद्राची मतमोजणी करण्यात येणार आहे.