ग्रामीण भागात नव्याने १७ रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST2021-05-16T04:32:19+5:302021-05-16T04:32:19+5:30
शहरातील ग्रामीण रुग्णालयात आलूर, तुरोरी, कोथळी, अचलेर, कलदेव निंबाळा, मुरुम या गावातील ४० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ...

ग्रामीण भागात नव्याने १७ रूग्णांची भर
शहरातील ग्रामीण रुग्णालयात आलूर, तुरोरी, कोथळी, अचलेर, कलदेव निंबाळा, मुरुम या गावातील ४० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ग्रामीण भागात आलूर २, कलदेव निंबाळा, अचलेर, तुरोरी, कोथळी येथे प्रत्येकी एक असे सहा तर शहरात एका रुग्णाची नव्याने भर पडली आहे. उमरगा तालुक्यातील आलूर, येणेगुर, डिग्गी, मुळज, नाईचाकूर या पाच प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत येणाऱ्या गावातील ९६ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये बोळेगाव, गुंजोटी, कदेर, पेठसांगवी, सालेगाव, काटेवाडी, उमरगा येथे प्रत्येकी एक आणि नारंगवाडी व येणेगूर येथे प्रत्येकी दोन अशा अकरा रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. सध्या शहरातील कोविड सेंटर मध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील ६३ जणांवर उपचार सुरु असून उपचारानंतर बरे झालेल्या तीन जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात ९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य विभाकडून देण्यात आली आहे.