क्षयरुग्णांची माहिती न कळविणाऱ्या खासगी दवाखान्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST2021-02-13T04:32:04+5:302021-02-13T04:32:04+5:30
आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे ...

क्षयरुग्णांची माहिती न कळविणाऱ्या खासगी दवाखान्यांवर होणार कारवाई
आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थानी क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॅलॉजी मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, क्षयरुग्णावर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषधे विक्रेते यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. जी संस्था नोंदणी करणार नाही. अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. त्यामुळे रुग्णालये, औषध विक्रेते, पॅथॉलॉजिस्ट यांनी रुग्णांची माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राचे क्षयरोग अधिकाऱ्यांनी केले आहे.