दारु वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:01+5:302020-12-29T04:31:01+5:30

बोर्डा येथील प्रशांत जगताप हे २७ डिसेंबर रोजी कळंब येथील रस्त्याने वाहन क्र. एमएच. २५ ए ६१७ मधून १८० ...

Action on a vehicle transporting alcohol | दारु वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

दारु वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

बोर्डा येथील प्रशांत जगताप हे २७ डिसेंबर रोजी कळंब येथील रस्त्याने वाहन क्र. एमएच. २५ ए ६१७ मधून १८० मि.ली. देशी दारुच्या १४० बाटल्या वाहून नेत असल्याचे कळंब पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. पोलीस पथकाने मद्यजप्त करुन संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला.

६२१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. रविवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ६२१ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातंर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून १ लाख ३५ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

“विनयभंग.”

महिलेचा विनयभंग मद्यपीविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका खेडेगावातील महिला २७ डिसेंबर रोजी शेतात काम करीत होती. यावेळी गावातील एका मद्यधुंद तरुणाने महिलेचा हात धरुन विनयभंग केला. तसेच, घडला प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात दिली. यावरुन तरुणाविरुध्द गुन्हा नोंद झाला.

Web Title: Action on a vehicle transporting alcohol