जुगाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST2021-07-22T04:21:11+5:302021-07-22T04:21:11+5:30

काेविड नियमांचे उल्लंघन, सहा जणांना दंड उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध मनाई आदेश लागू करण्यात आले ...

Action against gamblers | जुगाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

जुगाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

काेविड नियमांचे उल्लंघन, सहा जणांना दंड

उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सहाजणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापाेटी २ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दवाखान्यातील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या लंपास

उस्मानाबाद - भूम येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातून इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या लंपास केल्या. ही घटना १६ ते १९ जुलै या कालावधीत घडली. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप जाेगदंड यांनी भूम पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Action against gamblers