पावणेदाेनशे चालकांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:55+5:302021-04-15T04:30:55+5:30

जुगार अड्ड्यावर पाेलिसांचा छापा उस्मानाबाद - घारगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर शिराढाेण पाेलीस ठाण्याच्या पथकाने १३ एप्रिल राेजी अचानक छापा ...

Action against five hundred drivers | पावणेदाेनशे चालकांविरुद्ध कारवाई

पावणेदाेनशे चालकांविरुद्ध कारवाई

जुगार अड्ड्यावर पाेलिसांचा छापा

उस्मानाबाद - घारगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर शिराढाेण पाेलीस ठाण्याच्या पथकाने १३ एप्रिल राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह राेख ८ हजार ३०० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी वसंत जाधव, सलीम सय्यद (दाेघे रा. घारगाव), धाेंडीबा श्रीरामे, राहुल पानढवळे, जलील सय्यद (रा. रांजणी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

शिराढाेण येथे अवैध दारू विक्री

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील शिराढाेण येथील श्रावणी बारच्या समाेर सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला. या कारवाईत विदेशी दारूच्या जवळपास १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी ब्रम्हानंद, शेख नय्यर, महमद, समदर पटेल (सर्व रा.अंबाजाेगाई), सचिन माकाेडे (रा. शिराढाेण) यांच्याविरुद्ध शिराढाेण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

उस्मानाबाद - तालुक्यातील काैडगाव शिवारातील दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ एप्रिल राेजी साडेनऊ वाजता अचानक छापा मारला. या कारवाईत विदेशी दारूच्या ७४० बाटल्या जप्त केल्या. ट्रॅक्टरच्या माध्यमातून दारूच्या बाटल्यांची वाहतूक सुरू हाेती. याप्रकरणी कुमार तानवडे (रा. काैडगाव) याच्याविरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Action against five hundred drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.