जिल्ह्यात आणखी पाच खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:34 IST2021-04-22T04:34:16+5:302021-04-22T04:34:16+5:30

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने १५ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी बेडची संख्या ...

Acquired five more private hospitals in the district for Kovid patients | जिल्ह्यात आणखी पाच खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित

जिल्ह्यात आणखी पाच खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने १५ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी बेडची संख्या अपुरी पडत असल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी जिल्ह्यातील ५ खाजगी रुग्णालये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अधिग्रहित करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद शहरातील ३० खाटांचे डॉ. मोरया हॉस्पिटल ॲण्ड आय.सी.यू सेंटर, कळंब येथील २० खाटाचे चौधरी बाल रुग्णालय व आय.सी.यू सेंटर, उमरगा शहरातील १५ खाटांचे माऊली हॉस्पिटल, २२ खाटांच्या मातृछाया हॉस्पिटलमधील १० खाट कोविड रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. तर उमरगा शहरातील ४८ बेड क्षमतेच्या विजय क्लिनिकमधील १० बेड कोविड रुग्णांकरिता राखीव असणार आहेत.

Web Title: Acquired five more private hospitals in the district for Kovid patients