अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST2020-12-30T04:42:01+5:302020-12-30T04:42:01+5:30

नळदुर्ग : दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठिमागे बसलेली महिला गंभीर जखमी होऊन मयत झाली. ही घटना १५ नोव्हेंबर ...

Accused in an accident case | अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

नळदुर्ग : दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठिमागे बसलेली महिला गंभीर जखमी होऊन मयत झाली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर चिवरी शिवारात घडली. याप्रकरणी २७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तुळजापूर येथील समाधान हरिश्चंद्र गाटे हे त्यांच्या मेहुणी मीनाक्षी तांबे (रा. उंडरगाव) यांना दुचाकीवर पाठिमागे बसवून जात होते. चिवरी शिवारात समाधान यांनी अचानक ब्रेक दाबल्याने मीनाक्षी तांबे या खाली पडून गंभीर जखमी होऊन मयत झाल्या. याप्रकरणी मधुकर तांबे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रक-दुचाकीची धडक; दोघे गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

तुळजापूर : येथील जुन्या बसस्थानकाजवळ ट्रकची दुचाकीला पाठिमागून जोराची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना २६ डिसेंबर रोजी रोजी घडली. अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (केए ३२ डी २५२९) हा निष्काळजीपणे चालवून एमएच २५ एएम ४७९२ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात चालक हणमंत वटाणे व त्यांचा भाऊ भैरू हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हणमंत वटाणे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Accused in an accident case