अणदूर येथे ‘माझी वसुंधरा’ अभियानास गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST2021-04-20T04:33:53+5:302021-04-20T04:33:53+5:30
अणदूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात महाराष्ट्रातील ६६७ ग्रामपंचायती निवड झाली असून, यात ...

अणदूर येथे ‘माझी वसुंधरा’ अभियानास गती
अणदूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात महाराष्ट्रातील ६६७ ग्रामपंचायती निवड झाली असून, यात दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अणदूर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या अंतर्गत येथे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जवळपास मागील दीड महिन्यांपासून संपूर्ण गाव यासाठी एकत्र आले आहे.
अणदूर गाव हे हरितक्रांती करण्यासाठी व ‘माझी वसुंधरा’ हे अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, पं.स. सदस्या वैशाली मुळे, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, महादेवाप्पा आलुरे, माणिकराव आलुरे, निलकंठ नरे, मारुती खोबरे व ग्रामपंचायत सदस्य, प्रभात मंडळातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘माझी वसुंधरा’बाबत सार्वजनिक शपथ घेतली. यानंतर, अणदूर येथील हुतात्मा स्मारक परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. कन्या शाळा, पणन संस्था परिसर, स्मशानभूमी परिसर, रस्त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ करून पाचशे वृक्षाची लागवड करण्यात आली. या वृक्षाच्या संरक्षणाची जबाबदारीही ग्रामपंचायत कार्यालयाने घेतली आहे. त्यामुळे गावात सुंदरतेमध्ये भर पडणार आहे.
सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, धनराज मुळे, बाळकृष्ण घोडके पाटील, डॉ.जितेंद्र कानडे, बालाजी घुगे, सरिता मोकाशे, डॉ.विवेक बिराजदार, गणेश सूर्यवंशी, गोदावरी गुड्ड, अनुसया कांबळे, मोतनबी इनामदार, जयश्री व्हटकर, देवकी चौधरी, उज्ज्वला बंदपट्टे, अनिता घुगरे या ग्रामपंचायत सदस्यांनी या अभियानांतर्गत दोन लाख रुपये लोकवाटा जमा करून, त्यातूनच जेसीबीच्या साह्याने खड्डे मारणे, वृक्ष लागवड करणे, ट्री गार्ड बसविणे, बायोगॅस प्लांट बसविणे, बोअरचे पुनर्भरण आदी कामे हाती घेतली आहेत. या अगोदर जलजागृती अभियानाच्या माध्यमातून या गावाने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण काम करून, लोकसहभाग व लोकवाट्यातून पाणी आडवा पाणी जिरवा, नाला खोलीकरण, सरळीकरणासाठी एकजूट दाखवून दिली होती. याच धर्तीवर ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या अंतर्गत आता ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हरितक्रांतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.
फोटो : माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड व संगोपनाची शपथ घेतान जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण आदी.