शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परंड्याचा पेच! उद्धवसेनेकडून पाटलांना एबी फॉर्म; तर पवारांच्या मोटेंचा AB फॉर्मसह अर्ज दाखल

By चेतनकुमार धनुरे | Updated: October 25, 2024 17:55 IST

राष्ट्रवादी व उद्धवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. मात्र, पेच सुटत नसल्याने गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फाॅर्म देऊन टाकला.

धाराशिव : जिल्ह्यातील परंडा मतदारसंघावरुन उद्धवसेना व शरद पवार गटात खटके उडाल्याचे जाहीर झाले आहे. जागेचा तिढा सुटत नसल्याने गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारास एबी फाॅर्म देऊन टाकला. यापाठोपाठ आता शुक्रवारी शरद पवार गटाकडून माजी आमदार राहूल मोटे यांनीही एबी फाॅर्मसह शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे या जागेवर आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहेत.

परंडा मतदारसंघात आजवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आली आहे. येथून राष्ट्रवादीचे राहूल मोटे हे तीन टर्म आमदार होते. मागच्या निवडणुकीत ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पराभूत झाले. दरम्यान, यावेळी ही जागा कोणी लढवायची, यावरुन मोठा पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादी व उद्धवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. मात्र, पेच सुटत नसल्याने गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फाॅर्म देऊन टाकला. ते परंड्यात येऊन अर्ज दाखल करण्यापूर्वीच शुक्रवारी शरद पवार गटाचे माजी आमदार राहूल मोटे यांनी पक्षाच्या एबी फाॅर्मसह अर्ज भरुन टाकला. यामुळे परंड्यावरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वाढली आहे.

दोन्ही पक्ष लढण्यावर ठाम...आघाडीतील दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शुक्रवारी राहूल मोटे यांनी अर्ज भरला. रणजीत पाटीलही अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. उद्धवसेना व शरद पवार गट लढण्यावर ठाम आहेत.

एबी फाॅर्मसह अर्ज दाखलमाझ्या पक्षाच्या अधिकृत एबी फाॅर्मसह अर्ज दाखल केला आहे. मी लढण्यावर ठाम असून, ज्याअर्थी मला पक्षाने एबी फाॅर्म दिला आहे, त्याअर्थी पक्षाचीही आपल्या लढण्याला संमती आहे.-राहूल मोटे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparanda-acपरांडाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना