शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणात खेळणारी चिमुकली बेपत्ता; दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय

By बाबुराव चव्हाण | Updated: May 5, 2023 14:09 IST

घरापासून दूर शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्याने वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला

ईट (जि. धाराशिव) : घरासमाेरील अंगणात खेळणारी चार वर्षीय चिमुकली गुरुवारी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली हाेती. कुटुंबीयांनी सर्वत्र शाेध घेऊनही रात्री उशिरापर्यंत तिचा तपास लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी त्या चिमुकलीचे शव घराच्या पाठीमागील शेतात असलेल्या विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. ही घटना भूम तालक्यातील पखरूड येथे घडली.

भूम तालुक्यातील पखरूड येथील खर्डा राेडलगत उमेश भाेसले यांचे घर आहे. याच ठिकाणी भाेसले कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना रसिका नावाची चार वर्षीय मुलगी व मुलगा अशी अपत्ये आहेत. गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास रसिका व तिचा भाऊ दाेघेही घरासमाेरील अंगणामध्ये खेळत हाेते. त्यांची आई काेमल भाेसले या घरात कामात व्यस्त हाेत्या. दरम्यान, काम आटाेपल्यानंतर मुलांना पाहण्यासाठी त्या घराबाहेर आल्या असता, केवळ मुलगाच दिसून आला. रसिका काही दृष्टीस पडली नाही. शेजारी काेणाच्या तरी घरी गेली असावी, असे समजून त्यांनी प्रत्येक घरी जाऊन ‘रसिका आली आहे का?’ अशी विचारणा केली. 

परंतु, ‘‘सकाळपासून रसिका आमच्याकडे आलेली नाही’’, असे सर्वांनीच सांगितले. रसिका अवघ्या चार वर्षांची असल्याने तिला स्वत:हून घरासमाेरील रस्त्यापर्यंतही जाता येत नाही. मग रसिका गेली कुठे, असा प्रश्न तिच्या आईसह वडील उमेश भाेसले यांना पडला. यानंतर त्यांनी संपूर्ण गावात शाेध घेतला. खर्डा राेड परिसरातही शाेधाशाेध केली. परंतु, रसिकाचा काहीच तपास लागला नाही. असे असतानाच शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरामागे असलेल्या शेतातील एका विहिरीच्या पाण्यावर चिमुकल्या रसिकाचे शव तरंगताना आढळून आले. हे वृत्त समजताच रसिकाच्या आईने हंबरडा फाेडला. याप्रकरणी उमेश भाेसले यांनी वाशी पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

रसिका विहिरीपर्यंत गेली कशी?रसिका ही अवघ्या चार वर्षांची चिमुकली आहे. तिला स्वत:हून घरासमाेरील २० ते २५ फुट अंतरावर असलेल्या खर्डा रस्त्यापर्यंतही जाता येत नाही. घरामागील शेतात असलेली विहीर तर खूप दूर आहे. संपूर्ण शेताची नांगरट झाली आहे. धडधाकट व्यक्तिला या नांगरटीच्या शेतातून चालता येत नाही. मग रसिका तिथपर्यंत पाेहाेचली कशी, असा सवाल करीत वडील उमेश भाेसले यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादDeathमृत्यूagricultureशेतीFarmerशेतकरी