काेराेना काळात महावितरणकडून ९९१४ वीज जाेडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST2021-04-05T04:28:31+5:302021-04-05T04:28:31+5:30
उस्मानाबाद : काेराेनाच्या काळात विविध सेवांवर परिणाम झाला असला तरी महावितरणने वीजविषयक सेवांवर परिणाम हाेऊ दिला नाही, असा दावा ...

काेराेना काळात महावितरणकडून ९९१४ वीज जाेडण्या
उस्मानाबाद : काेराेनाच्या काळात विविध सेवांवर परिणाम झाला असला तरी महावितरणने वीजविषयक सेवांवर परिणाम हाेऊ दिला नाही, असा दावा करण्यात आला आहे. याच काळात जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ९१४ ग्राहकांना नवीन वीज जाेडणी देण्यात आली आहे.
एखाद्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडे नवीन कनेक्शनसाठी मागणी केल्यानंतर त्यास कमीत कमी वेळेत जाेडणी मिळावी, यासाठी विविध उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. नाेंदणी प्रक्रिया साेपी व कमी खर्चिक व्हावी, यासाठी ऑनलाइनचा पर्याय महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांसह अन्य ग्राहकांनाही चांगला फायदा हाेत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळेच काराेनासारख्या महामारीच्या काळातही ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळात १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत सर्व वर्गवारीतील ग्राहकांना ४१ हजार ७७३ नवीन जाेडण्या देण्यात आल्या आहेत. यात एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन जाेडण्या दिलेल्या ग्राहकांची संख्या ९ हजार ९१४ इतकी असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
चाैकट...
महावितरणच देणार मीटर...
मार्चअखेर सुमारे ३ लाख ३५ हजार वीजमीटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता खुल्या बाजारातून मीटर खरेदी करण्याची गरज भासणार नाही. उपलब्ध झालेले मीटर तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांची हाेणारी गैरसाेय दूर झाली आहे.
ट्रॅक स्टेटस पाहण्याची साेय...
वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणने वेबसाइट तसेच ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर नवीन वीजजाेडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियाही महावितरणने ऑनलाइन केली आहे. अर्ज केल्यापासून त्याची मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती (ट्रॅक स्टेटस) पाहण्यासाठी वीजग्राहकांना ऑनलाइन सोय उपलब्ध करून दिली आहे.