नियमांचे उल्लंघन, ९१ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST2021-05-16T04:32:15+5:302021-05-16T04:32:15+5:30

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. गर्दी टाळण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स ...

91 people fined for violating rules | नियमांचे उल्लंघन, ९१ जणांना दंड

नियमांचे उल्लंघन, ९१ जणांना दंड

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. गर्दी टाळण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स बंधनकारक केले आहे. अत्याश्यक सेवेतील दुकानदारांना दुकानासमोर गर्दी टाळण्याकरिता वर्तुळ आखणे अनिवार्य आहे. असे असले तरी अनेक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. शुक्रवारी असे २३ व्यक्तीं व दुकानदारांवर कारवाई करुन ४ हजार ९०० रुपयांचा दंड केला. शिवाय, हवेतून कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी विना मास्क बिनदिक्कतपणे फिरताना आढळून येत आहेत.

अशा विना मास्क फिरणाऱ्या ९१ जणांवर कारवाई करुन प्रत्येकी ५०० रुपयाप्रमाणे ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाया पोलीस व संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आल्या.

Web Title: 91 people fined for violating rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.