सिंदगाव ग्रामपंचायतीसाठी ८४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:14+5:302021-01-16T04:37:14+5:30
सिंदगाव येथील गेल्या ५० वर्षापासून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे दोन पॅनल निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकत्रित आले. परंतु ही दिलजमाई ...

सिंदगाव ग्रामपंचायतीसाठी ८४ टक्के मतदान
सिंदगाव येथील गेल्या ५० वर्षापासून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे दोन पॅनल निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकत्रित आले. परंतु ही दिलजमाई काहींना आवडली नाही. त्यामुळे दोन्ही पॅनलमधील नाराज कार्यकर्ते एकत्रित येवून सिंदगाव ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून कडवे आवाहन उभे केले होते. येथील नऊ जागेसाठी मतदान झाले. श्री दत्त ग्रामविकास पॅनलमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक निवडणुकीच्या मैदानात होते. त्यामुळे दोन्ही पॅनलच्या वतीने एकेक मतासाठी प्रयत्न करण्यात आले. तीन प्रभागातून नऊ जागेसाठी अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. एकूण दोन हजार एकशे सात पैकी एक हजार सातशे चौपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. प्रभाग दोन मध्ये विक्रमी ८८ टक्के तर प्रभाग एक मध्ये ८६ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीतील मतदानाची झालेली विक्रमी टक्केवारीची वाढ कुणाच्या पारड्यात पडणार, याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग तीन मधून माजी उपसरपंच विवेकानंद मेलगिरी निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.