८ पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी; १६ जणांना नाेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:17+5:302021-01-08T05:43:17+5:30
उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे पुजाऱ्यांना महागात पडले आहे. आठ पुजाऱ्यांना मंदिर ...

८ पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी; १६ जणांना नाेटीस
उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे पुजाऱ्यांना महागात पडले आहे. आठ पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली, तर इतर १६ जणांना कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे. या कारवाईमुळे पुजाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरात नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही पुजाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली केल्याचा प्रकार समाेर आला आहे. यानंतर मंदिर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुजारी कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले, ओंकार भिसे, आकाश परदेशी, अभिजीत कुतवळ या आठ जणांना तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर पाळी नसताना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याप्रकरणी १६ पुजाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आली आहे. आपणाविरुद्ध सहा महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नाेटीस तामील करण्यात आली आहे. यामध्ये सत्यजीत कदम, विशाल सोंजी, शशिकांत पाटील, अक्षय कदम, अथर्व कदम, शशिकांत परमेश्वर, बाबासाहेब पाटील, सौरभ परमेश्वर, सुहास कदम भैये, आकाश कदम भैये, आनंद पाटील, नेताजी पाटील, विशाल पाटील, दिनेश परमेश्वर, सार्थक मलबा, सुहास कदम भैये या पुजाऱ्यांचा समावेश आहे. मंदिर प्रशासनाच्या या कारवाईमुळे पुजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.