२१ ग्रामपंचायतीसाठी ७७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:11+5:302021-01-16T04:37:11+5:30
लोहारा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली हाेती. यापैकी आरणी, तावशीगड, धानुरी, राजेगाव व मार्डी या पाच ग्रामपंचाती बिनविरोध निघाल्या. ...

२१ ग्रामपंचायतीसाठी ७७ टक्के मतदान
लोहारा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली हाेती. यापैकी आरणी, तावशीगड, धानुरी, राजेगाव व मार्डी या पाच ग्रामपंचाती बिनविरोध निघाल्या. त्यामुळे शुक्रवारी २१ ग्रामपंचायतीच्या १३८ जागेसाठी मतदान झाले. सकाळी थंडी असल्याने मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजेपर्यत ९.५३ टक्के मतदान झाले हाेते. यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. साडेअकरा वाजता २९.३३ टक्के, दुपारी दीड वाजता ५१.४७ टक्के, साडे तन वाजता ६८.३३ टक्के मतदान झाले. यानंतर कार्यकर्ते तसेच पदाधिकार्यांनी राहिलेले मतदान करून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढून ७७.३३ वर जावून ठेपला. २९ हजार २७३ पैकी २२ हजार ६३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात १२ हजार ६६ पुरुष तर १० हजार ५६२ स्त्री मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे.
चाैकट...
भातागळी येथे २०० मतदाराची नावेच मतदार यादीत नाहीत. यात बहुतांश महिला मतदार आहेत. तसेच १० ते १२ मतदारांची दुबार नावे आहेत. तर कास्ती खुर्द येथील मतदार यादीमध्ये जवळपास ५० मतदारांची नावे नव्हती. बेंडकाळ येथील दोन मतदारांचे नावे कास्ती खुर्दच्या मतदार यादीत होती.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने सतर्कता बाळगत प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्क्रिंनिंग व्यवस्था करण्यात आली होती. मतदानासाठी केंद्रावर आलेल्या प्रत्येक मतदारांची ऑक्सिमिटरव्दारे तपासणी करून मतदान केंद्रात सोडले जात होते.