देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST2021-05-08T04:34:53+5:302021-05-08T04:34:53+5:30

भिंतींची पडझड ईट - भूम तालुक्यातील पखरूड गावापासून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थानच्या काही भिंतींची पडझड झाली ...

48 bottles of liquor seized | देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त

देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त

भिंतींची पडझड

ईट - भूम तालुक्यातील पखरूड गावापासून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थानच्या काही भिंतींची पडझड झाली आहे. तीर्थक्षेत्र विकास निधीतून डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भाविकांसह पखरूडकरातून करण्यात आली आहे.

पुलाची कामे रखडली

उस्मानाबाद - जुन्या उपळा रस्त्याचे काम पूर्ण हाेऊन काही महिन्यांचा कालावधी लाेटला आहे. मात्र, या रस्त्यावरील पुलाची कामे अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाहीत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुलाची रखडलेली कामे पूर्ण न झाल्यास लाेकांना गैरसाेयीचा सामना करावा लागणार आहे.

‘अंडरपास’ची मागणी

उस्मानाबाद -औरंगाबाद-साेलापूर हायवेला जुना उपळा रस्ता जाेडलेला आहे. या रस्त्यावर वाहतूक ही वाढली आहे. परंतु, या ठिकाणी अंडरपास देण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना विरूद्ध दिशेने प्रवास करावा लागताे. अशावेळी अपघाती घटना ही घडत आहेत.

बांध बंदिस्तीची कामे सुरू

ईट - पावसाचे पाणी वाहून जाऊ नये तसेच जमिनीची धूप थांबावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने पखरूड शिवारात सध्या बांध बंदिस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. आजवर शेकडाे हेक्टरवरील कामे पूर्ण करण्यात आलेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: 48 bottles of liquor seized