आनंदवाडीत ४ सदस्य बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:48+5:302021-01-08T05:44:48+5:30
भूम तालुक्यातील आनंदवाडी, आरेकरवाडी, गोसावीवाडी या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या आनंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग व ७ सदस्य संख्या ...

आनंदवाडीत ४ सदस्य बिनविरोध
भूम तालुक्यातील आनंदवाडी, आरेकरवाडी, गोसावीवाडी या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या आनंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग व ७ सदस्य संख्या असून, जवळपास १३०० मतदार आहेत. यातील प्रभाग १ मधील सर्वसाधारण प्रवर्गातून बाबूराव यादव खामकर, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून राणी गोवर्धन वनवे तर ओबीसी महिला प्रवर्गातून पूनम धनराज वनवे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून बायडाबाई वाल्मीक उपासे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग २ मध्ये सोमनाथ लक्ष्मण फरताडे विरुद्ध शहाजी तुकाराम आरेकर यांच्यात तर मालन नामदेव उपासे विरुद्ध रोहिणी दत्ता कागदे यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ३ मध्ये अशोक बापू खोत विरुद्ध भागूबाई रामा खोत यांच्यात लढत होणार आहे. एकंदरीत आनंदवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या ७ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ३ जागांसाठी लढत होत आहे.