अनाळा येथील छाप्यात ३१ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:47+5:302021-07-07T04:40:47+5:30

------------ जुन्या भांडणावरून दगड, काठीने मारहाण डाेकेवाडी येथील घटना : चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून चाैघांनी ...

31,000 gutka seized in raid at Anala | अनाळा येथील छाप्यात ३१ हजारांचा गुटखा जप्त

अनाळा येथील छाप्यात ३१ हजारांचा गुटखा जप्त

------------

जुन्या भांडणावरून दगड, काठीने मारहाण

डाेकेवाडी येथील घटना : चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून चाैघांनी मिळून पाचजणांना दगड, काठीने बेदम मारहाण केली. ही घटना ४ जुलै राेजी वाशी तालुक्यातील डाेकेवाडी येथे घडली. याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, डाेकेवाडी येथील रेशमा निखिल भाेसले यांच्यासह पती निखिल, सासरे तात्या, सासू रेणुका व मुलगी दीक्षा यांना ४ जुलै राेजी ८ वाजेच्या सुमारास जामखेड येथील नातेवाईक विक्या भाेसले, नागेश भाेसले, अनुल ऊर्फ भय्या भाेसले, भाेलड्या काळे यांनी मागील भांडणाचा राग धरून रेशमा भाेसले यांच्या कुटुंबीयांस शिवीगाळ केली. यानंतर दगड व काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी रेश्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जुलै राेजी वाशी पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: 31,000 gutka seized in raid at Anala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.