चाकूचा धाक दाखवून पाेकलेनमधील ३०० लिटर डिझेल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:54+5:302021-03-04T05:00:54+5:30

नळदुर्ग - सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामावरील पेवर व पाेकलेन मशीनचे लाॅक ताेडून व वाॅचमनला चाकूचा ...

300 liter diesel lamp in Paeklan showing fear of knife | चाकूचा धाक दाखवून पाेकलेनमधील ३०० लिटर डिझेल लंपास

चाकूचा धाक दाखवून पाेकलेनमधील ३०० लिटर डिझेल लंपास

नळदुर्ग - सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामावरील पेवर व पाेकलेन मशीनचे लाॅक ताेडून व वाॅचमनला चाकूचा धाक दाखवित सुमारे ३०० लिटर डिझेल लंपास केले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील गुजनूर शिवारात २८ फेब्रुवारी राेजी घडली.

नळदुर्ग-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम गुजनूर शिवारातील खुदावाडी पाटीपर्यंत आले आहे. दिवसभराच्या कामानंतर पेवर व माेकलेन मशीन त्याच ठिकाणी उभे केली हाेती. हीच संधी साधत २८ फेब्रुवारीच्या पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चाैघे अनाेळखी व्यक्ती आले. वाहनातून उतरून त्यांनी पेवर मशीन तसेच पाेकलेनच्या डिझेल टाकीचे लाॅक ताेडले. यावेळी तेथील वाॅचमनने हटकले असता, त्यांनी चाकूचा धाक दाखवित बेदम मारहाण केली. यानंतर टाकीतील सुमारे ३०० लिटर डिझेल लंपास केले. या प्रकरणी देवीदास गाडेकर (रा. दहिटणे, ता. अक्कलकोट) यांनी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. अधिक तपास साहय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत हे करीत आहेत.

Web Title: 300 liter diesel lamp in Paeklan showing fear of knife