तेर येथे लाेकसहभागातून ३० बेडचे आयसाेलेशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:35+5:302021-05-07T04:34:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या ...

A 30-bed isolation center at Lake Sahabhaga at Ter | तेर येथे लाेकसहभागातून ३० बेडचे आयसाेलेशन सेंटर

तेर येथे लाेकसहभागातून ३० बेडचे आयसाेलेशन सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्क

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या गावांमध्ये कोरोना कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तेर गावात लाेकसहभागातून ३० बेडचे आयसाेलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बेड उपलब्ध करून दिले आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील माेठी लाेकसंख्या असलेल्या तेर गावात काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन गावातील महाराष्ट्र संत माध्यमिक विद्यालयात आयसाेलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय विश्वकर्मा यांच्या हस्ते फित कापून या सेंटरचे लाेकार्पण करण्यात आले. या सेंटरसाठी ३० बेड भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, या सेंटरमध्ये दाखल हाेणाऱ्या रूग्णांना गावातील खासगी डाॅक्टर सेवा देणार आहेत. येथे दाखल रूग्णांना चहा, नाश्ता, पाणी व इतर सर्व सुविधा लोकसहभागातून पुरविल्या जाणार आहेत. या सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जीद मनीयार, गोरोबा पाडुळे, विठ्ठल लामतुरे, जुनेद मोमीन, डॉ. बालाजी खराडे, डॉ. सुनील शेंडगे, डॉ. दीपक ढेकणे, तानाजी पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य रविराज चौगुले, आदी उपस्थित हाेते.

Web Title: A 30-bed isolation center at Lake Sahabhaga at Ter