उमरग्यात आढळले कोरोनाचे २६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:26+5:302021-03-27T04:34:26+5:30
उमरगा उपजिल्हा रुग्णालयातून २४ मार्च रोजी पाठविलेल्या १९ स्वॅबचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा आला. यामध्ये पाच व्यक्ती कोरोना ...

उमरग्यात आढळले कोरोनाचे २६ रुग्ण
उमरगा उपजिल्हा रुग्णालयातून २४ मार्च रोजी पाठविलेल्या १९ स्वॅबचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा आला. यामध्ये पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यात एकोंडी, दाबका, नळवाडी, बालाजी नगर उमरगा, बडूर (ता. निलंगा) येथील रुग्णांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी ८९ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये २० व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
शुक्रवारी २१ स्वॅब घेण्यात आले असून, यापूर्वी पाठविलेल्या ७९ स्वॅबचे अहवालही अद्याप येणे बाकी असल्याचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांनी सांगितले. सध्या येथील उपजिल्हा रुग्णालयात ३१, ईदगाह कोविड केअर सेंटरमध्ये २८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय, ४५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. १० रुग्णांना पुढील उचरासाठी रेफेर करण्यात आले आहे.