११ जागांसाठी २५ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:55+5:302021-01-13T05:25:55+5:30

गोरोबाकाका समाधी दर्शनासाठी गर्दी तेर : शनिवारी सफला एकादशीनिमित्त येथील संत गोरोबा काकांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ...

25 candidates for 11 seats | ११ जागांसाठी २५ उमेदवार

११ जागांसाठी २५ उमेदवार

गोरोबाकाका समाधी दर्शनासाठी गर्दी

तेर : शनिवारी सफला एकादशीनिमित्त येथील संत गोरोबा काकांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोना महामारी काळात बंद केलेले मंदिर डिसेंबर महिन्यात खुले केले होते. मात्र, भाविकांची फारशी गर्दी नव्हती. ९ जानेवारी रोजी सफला एकादशी ही मकर संक्रांतीच्या तोंडावर आल्यामुळे समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिर परिसर व बसस्थानक परिसरात होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

धम्मध्वज दिनानिमित्त तुळजापुरात विशेष वंदना

तुळजापूर : भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जागतिक धम्मध्वज दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष देवीदास कदम यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकवण्यात आला. तसेच श्रीनिवास साळउंके यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद रोकडे, सुरेश चौधरी, जीवन कदम, कमलेश कदम, सागर चौगुले, लक्ष्मण कदम, अभिजीत कदम, शुभम कदम, रवी साखरे, धम्मशील कदम, शंभू ढाले, नेताजी सोनवणे आदी उपस्थित होते.

वाहनांना फास्ट टॅग करून घेण्याचे आवाहन

उस्मानाबाद : सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलेला असून फास्ट टॅग काढण्यासाठी केवळ दहा मिनिटे लागतात. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी फास्ट टॅग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी उस्मानाबाद शहरात ॲक्सिस, आयसीआयसीआय, आयडीएफसी, एसबीआय, एचडीएफसी बँक, पेटियम, कोटक महिंद्रा बँक, सिंडिकेट बँक, इन्डसिंड बँक, युनियन बँक आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

गीता जयंत्युत्सवाची तुळजापुरात सांगता

तुळजापूर : शहरातील कोंडो वाड्यामध्ये परंपरागत पध्दतीने गीता जयंत्युत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी धार्मिक विधी होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यावेळी अश्विनी कोंडो, संजीवनी प्रयाग, सुवर्णा चाटुफळे, मीना मलबा, भाग्यश्री मलबा, उमा महामुनी, प्रज्ञा पाठक, आशा गायकवाड, माधुरी कांबळे, सुरेखा बारस्कर, मनीषा साळुंक, वर्षा साळुंके, संगीता साळउंके, प्रिया महामुनी, अपर्णा देवळालकर, रंजना पाठक, निर्ला कराडे आदी उपस्थित होते.

निधी संकलन सुरू

तुळजापूर : अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी तुळजापुरात निधी संकलन सुरू करण्यात आले आहे. शहरातील मंकावती गल्ली येथील भजनी मंडळास भेट देऊन या निधी संकलनाबाबत मीना सोमाजी यांनी माहिती दिली.

प्रचाराची रणधुमाळी

वाशी : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. अवघ्या पाच दिवसांवर मतदान येवून ठेपले असून स्थानिक नेते, पॅनलप्रमुख, उमेदवार मतदारांच्या गाठीभेटींवर भर देत आहेत.

दुरंगी सामना

तामलवाडी : येथील ग्रामपंचायतीच्या ११ पैकी एक जागा बिनविरोध निघाली असून उर्वरित दहा जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी दोन पॅनलमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत.

उमेदवारांचा सत्कार

लोहारा : शिवसाई संस्थेच्या वतीने तालुक्यातील दस्तापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सोमनाथ पाटील व अन्य दोन उमेदवारांचा व जनसंपर्क प्रमुखपदी निवड झालेले वैजनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते.

बाजार फुलला

तुळजापूर : अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेल्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त येथील बाजारपेठ सजली आहे. बाजारात हळदी-कुंकू, तीळ-गुळ यासह संक्रांतीनिमित्त लुटावयाच्या वाणाच्या विविध वस्तूंचीही मोठी रेलचेल दिसून येत आहे.

Web Title: 25 candidates for 11 seats