१८२ नागरिकांनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:30 IST2021-05-22T04:30:19+5:302021-05-22T04:30:19+5:30
मुरुम : दुसऱ्या लाटेत शहरातील १८२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात करून घरी परतले असून, दहा जणांचा या आजाराने बळी ...

१८२ नागरिकांनी कोरोनाला हरविले
मुरुम : दुसऱ्या लाटेत शहरातील १८२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात करून घरी परतले असून, दहा जणांचा या आजाराने बळी गेला आहे. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात शहर व परिसरातील २६ कोविड संशयित व संपर्कातील लोकांची शुक्रवारी रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील तीन तर ग्रामीण भागात सहा अशा एकूण नऊ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. मागील आठ दिवसात रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूची संख्या वाढल्याने शहरवासीयांत चिंता कायम आहे. शहरातील बाधितांची संख्या ३ ने वाढून २१७ वर पोहचली आहे. शहरात मागील आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. शुक्रवारपर्यंत केवळ दहा रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. सोमवार, मंगळवार प्रत्येकी दोन तर बुधवारी एक, गुरुवारी दोन आणि शुक्रवारी तीन रुग्णांची शहरात वाढ झाली. शहरात १ ते २१ मे या दरम्यान सात जणांचा या आजाराने मृत्यू झाला असून, ७५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्युदर वाढल्याने शहरवासीयांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी मुरुम, तुगाव, सुंदरवाडी, भुसणी, केसरजवळगा, भोसगा येथील २६ जणांची चाचणी करण्यात आली. यात शहरात तीन, सुंदरवाडी तीन, तुगाव दोन तर भुसणी येथे एक अशा नऊ बाधितांची नव्याने भर पडली आहे.
चौकट.....
नऊजणांना डिस्चार्ज
शहरातील कोविड सेंटरमध्ये सध्या उमरगा व लोहारा तालुक्यातील ५५ रुग्ण उपचाराखाली असून बरे झालेल्या ९ जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयात १२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे आणि पालिकेचे अधिकारी विक्रम देवकर यांनी दिली आहे.