अणदुरातील शिबिरात १६६ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST2021-09-10T04:39:52+5:302021-09-10T04:39:52+5:30

अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र आलुरे तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डाॅ. उमाकांत ...

166 people donated blood in Andura camp | अणदुरातील शिबिरात १६६ जणांनी केले रक्तदान

अणदुरातील शिबिरात १६६ जणांनी केले रक्तदान

अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र आलुरे तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डाॅ. उमाकांत चनशेट्टी, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, बसवेश्वर जन्मोत्सव समितीचे सोमनाथ शेटे, श्रीशैल चौधरी, राचप्पा जिडगे, उमाकांत आलुरे, यश कर्पे, सोलापूर येथील अश्विनी रक्तपेढीचे डाॅ. सिद्धार्थ, डाॅ. प्रद्युम्न, डाॅ. भारत, डाॅ. नागार्जुन, उपसरपंच डाॅ. नागनाथ कुंभार, डाॅ. जितेंद्र कानडे, सिद्रामप्पा खराडे, डाॅ. विवेक बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पन्नासपेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिबिरात रक्तदान केलेल्या दात्यांना सि. ना. आलुरे गुरुजी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. एम. बी. बिराजदार यांनी केले तर आभार प्रदीप कदम यांनी मानले.

Web Title: 166 people donated blood in Andura camp