वाशी तालुक्यात नवे १२२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:21+5:302021-05-10T04:33:21+5:30
वाशी तालुक्यात ९ मे पर्यंत ६५३ कोरोनाबाधित होते. त्यापैकी रविवारी २६ रुग्ण हे उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत़ ...

वाशी तालुक्यात नवे १२२ रुग्ण
वाशी तालुक्यात ९ मे पर्यंत ६५३ कोरोनाबाधित होते. त्यापैकी रविवारी २६ रुग्ण हे उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत़ वाशी तालुक्यात कोरोनाचा आलेख चढताच दिसून येत आहे़ रविवारी तालुक्यात तब्बल १२२ नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत़ येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील दोन सेंटरमध्ये २३४, ग्रामीण रुग्णालयात २२ व विठ्ठल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सहा कोरोनाबाधितांवर उपचार चालू आहेत़ एकूण ६५३ रुग्णांपैकी २६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ६२७ रुग्ण हे उपचाराधीन आहेत़ ४० महिला रुग्ण अन्नपूर्णा मंगल कार्यालयात उपचार घेत आहेत, तर २०३ रुग्ण हे होम आयसोलेशन आहेत़ तालुक्यातील जे रुग्ण होम आयसोलशेनमध्ये आहेत, असे सर्व रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नरसिंग जाधव यांनी दिली़ रुग्णांची संख्या वाढल्यास माजी मंत्री आ. डॉ़ तानाजी सावंत यांनी बार्शी येथे सुरू केलेल्या जंबो कोविड केअर सेंटरकडे उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़ तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गावातील काही शाळा व मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही तहसीलदार जाधव म्हणाले.