ऑक्सिजन मशीनसाठी पालकमंत्र्यांकडून ११ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:50+5:302021-04-21T04:32:50+5:30

कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असताना शासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात नियमितपणे पुरेसा ऑक्सीजन पुरवठा व्हावा, आवश्यक संखेने ...

11 lakh assistance from Guardian Minister for Oxygen Machine | ऑक्सिजन मशीनसाठी पालकमंत्र्यांकडून ११ लाखांची मदत

ऑक्सिजन मशीनसाठी पालकमंत्र्यांकडून ११ लाखांची मदत

कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असताना शासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात नियमितपणे पुरेसा ऑक्सीजन पुरवठा व्हावा, आवश्यक संखेने रेमडेसिवीर औषध मिळावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सध्या जिल्ह्यात बेड उपलब्ध होत आहेत. परंतु, रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होणे अपेक्षित आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात रुग्णांना त्या-त्या भागातच तात्काळ सेवा मिळावी, यासाठी चार ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी निधीचे नियोजन केले आहे. दरम्यान सध्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. अचानक धाप लागल्याने ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी रुग्णाच्या जिवावर बेतते. त्यामुळे ११ लाख रुपये वैयक्तिक मदत करीत रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तात्काळ मशीन खरेदी करून गरजू रुग्णांसाठी उपयोगात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे मशीन हवेतून ऑक्सीजन निर्मिती करते. तोच ऑक्सिजन रुग्णांना तात्काळ देता येतो.

Web Title: 11 lakh assistance from Guardian Minister for Oxygen Machine