१०२ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:08+5:302021-01-09T04:27:08+5:30

फोटो (८-१) बालाजी बिराजदार लोहारा : आ. ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवा सेनेच्या ...

102 donors donated blood | १०२ दात्यांनी केले रक्तदान

१०२ दात्यांनी केले रक्तदान

फोटो (८-१) बालाजी बिराजदार

लोहारा : आ. ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवा सेनेच्या वतीने गुरुवारी शहरात घेण्यात आलेल्या शिबिरात १०२ दात्यांनी रक्तदान केले आहे. तसेच राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

लोहारा शहरातील बसवेश्वर मंदिरात झालेल्या शिबिराचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगदिश लांडगे, नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, शिवराज चिनगुंडे, सुधीर घोडके, श्रीकांत भरारे, प्रेम लांडगे, किरण पाटील, सुनील देशमाने, राम चपळे, नितीन जाधव, अमिन मुलानी, नामदेव लोभे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी १०२ दात्यांनी रक्तदान करून केले. वाढदिवसानिमित्त शहरातील कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने घेतलेल्या रास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांचे बक्षीस वितरण युवा नेते किरण गायकवाड व तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे. स्पर्धेत राज्यभरातून ६४ संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये शिवशक्ती संघ येडशी प्रथम, द्वितीय पारितोषिक बालाजीनगर, उस्मानाबाद तर तृतीय बक्षीस घाटी उस्मानाबाद यांना देण्यात आले. यावेळी कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे गोपाळ सुतार, भीमाशंकर डोकडे, नितीन वाघमारे, भरत सुतार, प्रा. राजपाल वाघमारे यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट पंच म्हणून भीमाशंकर डोकडे व सुनील देशमाने यांचा सत्कार करण्यात आला आहे. लोहारा शहरातील प्रथम नगरध्यक्षा पौर्णिमा लांडगे यांच्या निवासस्थानी युवा नेते किरण गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

Web Title: 102 donors donated blood