मालट्रकमधील १० टायर लंपास

By Admin | Updated: November 18, 2015 00:38 IST2015-11-18T00:33:13+5:302015-11-18T00:38:16+5:30

तुळजापूर : धाब्यासमोर थांबलेल्या एका मालट्रकमधील १ लाख ३२ हजार रूपयांचे दहा टायर चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुळजापूर- नळदुर्ग मार्गावर घडली असून,

10 Tire Lampas in Maltrac | मालट्रकमधील १० टायर लंपास

मालट्रकमधील १० टायर लंपास


तुळजापूर : धाब्यासमोर थांबलेल्या एका मालट्रकमधील १ लाख ३२ हजार रूपयांचे दहा टायर चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुळजापूर- नळदुर्ग मार्गावर घडली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथून एका कंपनीचे टायर घेवून हैद्राबादकडे जाणारा ट्रक (क्ऱएम़एच़२४- एफ़ ७५८१) हा रविवारी मध्यरात्री तुळजापूर- नळदुर्ग मार्गावरील तिर्थ शिवारातील एका धाब्यावर थांबविण्यात आला़ ट्रकचालक राजकुमार नागाप्पा वालीकर हे त्या धाब्यावर रात्री झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधील १ लाख ३२ हजार रूपयांचे दहा टायर हातोहात लंपास केले़ याबाबत राजकुमार वालीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखाल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 10 Tire Lampas in Maltrac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.