‘झी’ समूहाच्या सुभाष चंद्रा यांना सेबीचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 10:30 IST2023-06-13T10:30:00+5:302023-06-13T10:30:46+5:30
पुनीत गोएंका यांना संचालकपदावरून हटवले

‘झी’ समूहाच्या सुभाष चंद्रा यांना सेबीचा दणका
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: झी समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा व त्यांचे पुत्र व ‘झी’चे संचालक पुनीत गोएंका यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीतील पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने या दोघांनाही संचालकपदावर राहण्यास बंदी केली आहे. झी समूहाच्या कोणत्याही कंपनी अथवा उपकंपनीत ते संचालक राहू शकत नाहीत, असा अंतरिम आदेश सेबीने सोमवारी जारी केला आहे. तसेच या आदेशाविरोधात २१ दिवसांच्या आत त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.
सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता येस बँकेसोबत २०० कोटी रुपयांचा व्यवहार केला. तसेच समूह कंपन्यांतील अनेक कंपन्यांकडून येणे बाकी असल्याचे दाखवत त्या पैशांचा अपहार केल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. झी कंपनीचा वापर सुभाष चंद्रा यांनी पिगी बँकेसारखा केला, असाही शेरा सेबीने मारला आहे.