उद्यानास वेळे आधी टाळे मारल्याची विचारणा केली म्हणून डोक्यात दगड घालत मारहाण
By धीरज परब | Updated: May 8, 2023 13:31 IST2023-05-08T13:31:18+5:302023-05-08T13:31:24+5:30
मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ५ मध्ये राहणारे नमन सुनील झा (३१) हे नेहमी प्रमाणे रविवारी चालण्यासाठी लगतच्या स्वामी विवेकानंद उद्यानात गेले होते

उद्यानास वेळे आधी टाळे मारल्याची विचारणा केली म्हणून डोक्यात दगड घालत मारहाण
मीरारोड - मीरारोडच्या शांतीनगर मधील एका उद्यानात चालण्यासाठी गेलेल्या तरुणाने प्रवेशद्वारास टाळे मारल्याचा जाब विचारला म्हणून चौघांनी मारहाण करत डोक्यात दगड मारल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे
मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ५ मध्ये राहणारे नमन सुनील झा (३१) हे नेहमी प्रमाणे रविवारी चालण्यासाठी लगतच्या स्वामी विवेकानंद उद्यानात गेले होते. त्यावेळी एक लहान मुलगी शिटी वाजवत सर्वाना उद्यानाची वेळ संपली आहे, त्यामुळे सर्वानी बाहेर चला असे सांगत फिरत होती. नमन व सोबतच्या अन्य एका व्यक्तीने मुलीला सांगितले की, उद्यान बंद व्हायला अजून १० मिनिटे असल्याचे सांगितले. त्यावर मुलीने उद्यानाच्या प्रवेशद्वारास आतून टाळे लावले.
त्यावेळी मुली सोबत असलेल्या सुनील कुमार पाठक (५०) रा . सेक्टर ७ यांना झा यांनी १० मिनिटे आधीच प्रवेशद्वार बंद केल्या बद्दल विचारणा केली . त्यावरून सुनील आणि सोबत असलेली पूजा अवषेश गिरी (३०) रा . सेक्टर ६ तिचा नवरा अवधेश , अशोक चंद्रा यांनी शिवीगाळ करत झा यांना ठोश्या बुक्क्यांनी मारहाण केली . तसेच त्यांच्या डोक्यात दगड मारल्याने रक्त निघून ते जखमी झाले . नया नगर पोलिसांनी सुनील , पूजा , अवधेश व अशोक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.