वडगाव मावळ : एका अल्पवयीन मुलीचा खून करून स्वत : ही आत्महत्या केल्याचे उघड झाले. इंद्रायणी नदीतून मृतदेह काढले. श्रीराम सुग्रीव गिरी (रा.तळेगाव दाभाडे ) असे आत्महत्या करणा युवकाचे नाव आहे. बुधवारी गिरीने सकाळी अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीस फूस लावून एका हॉटेलमध्ये आणले. दुपारी साडेतीनपर्यंत ते हॉटेलमधील खोलीत होते.त्यानंतर गिरी तेथून फरार झाला.हॉटेल व्यवस्थापकाने रूममध्ये जाऊन पाहिले असता ही तरूणी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर वार करून तिचा खून केला होता. खून करून त्याने स्वत: चे जीवन संपवले.
पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक दिलीप देसाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलिस गणेश तावरे, शशिकांत घोपडे, राजेंद पवार यांनी नदीकाठी तपासणी केली. गुरूवारी रात्री मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या टीमने शोध कार्य सुरू केले. त्यांना ही यश आले नाही. शेवटी सुदुंब्रे येथील एनडीआरएफच्या सोळा जवानांनी पानबुडीच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले.