शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:28 IST

पैशांची मागणी : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देपोलीस सूत्रानुसार २ मार्च रोजी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास लखन दिनकर काळे (२९, रा. सायत) हा शिवारात विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. लखनचे घराजवळील एक तरुणीशी प्रेमसंबंध होते. ती तरुणी लखनला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत पैशांची मागणी करीत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.

अमरावती - प्रेयसीने फोनवरून वारंवार पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे. याप्रकरणात भातकुली पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. 

पोलीस सूत्रानुसार २ मार्च रोजी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास लखन दिनकर काळे (२९, रा. सायत) हा शिवारात विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. लखनला वडील दिनकर यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. ५ मार्च रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हे प्रकरण पुढील तपासकामी भातकुली पोलिसांच्या स्वाधीन केले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज दाभाडे यांनी नातेवाइकांचे जबाब नोंदविले. लखनचे घराजवळील एक तरुणीशी प्रेमसंबंध होते. ती तरुणी लखनला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत पैशांची मागणी करीत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. पोलिसांनी मृताच्या मोबाइलचा सीडीआर काढला असता त्यामध्ये व्हॉट्स-अ‍ॅपवर लखन व त्या तरुणीचे चॅटिंग आढळून आले. तपासानंतर लखनला तरुणीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणीविरुद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसAmravatiअमरावती