शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या हत्येप्रकरणी युवकाला अटक,

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 22:57 IST

विशाल नगरात राहणाऱ्या अपूर्वा अनंतराव यादव (१९) या तरुणीचा मंगळवारी दुपारी राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील एका संशयित युवकाला लातूर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली

लातूर  - विशाल नगरात राहणाऱ्या अपूर्वा अनंतराव यादव (१९) या तरुणीचा मंगळवारी दुपारी राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील एका संशयित युवकाला लातूर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली आहे. कर्नाटक राज्यातील जमखंडी-बागलकोट येथे वैद्यकीय शिक्षण घेणारी अपूर्वा अनंतराव यादव ही तरुणी सुट्यानिमित्त लातुरातील घरी आली होती. दरम्यान, मंगळवारी वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर आई सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत देवदर्शनासाठी बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, अपूर्वा ही घरात एकटीच असल्याची संधी साधून मारेकºयाने घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ती मरण पावली. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, शहर उपाधीक्षक हिंमत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या तपासासाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. या खून प्रकरणी विशाल नगरातच राहणा-या अमर व्यंकटराव शिंदे (२०) याला राहत्या घरातून पोलीस पथकाने बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली. पथकात गुन्हे शाखेचे पोनि. सुधाकर नागरगोजे, सपोनि. सुधाकर बावकर, सुनील रेजितवाड, पोना. नामदेव पाटील, बालाजी जाधव, खुर्रम काझी, विनोद चिलमे, रवि गोंदकर, राजेंद्र टेकाळे, यशपाल कांबळे, भागवत कठारे, गोविंद जाधव, नागनाथ जांभळे यांच्यासह सायबर सेलचे संतोष देवडे, राजेश कंचे, गणेश साठे, रियाज सौदागर, अमोल वाघमारे यांचा समावेश होता.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी