मुंबई : वडाळ्यातील एका आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी हसन कांद्रि याला (वय २३, रा. शांतीनगर) वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली.शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास परिसरात अल्पवयीन मुलगा घराबाहेर एकटाच खेळत होता. आरोपीने गोड बोलून पूर्व मुक्त महामार्गाशेजारील शांतीनगर खाडीच्या झाडाझुडपांत त्याला नेले. तेथे त्याचे तोंड दाबून त्याच्याशी अश्लील चाळे करू लागला. या विभागातील रस्त्यावरून जाणा-या मुलांना झाडाझुडपांत संशयित हालचाली दिसून आल्या. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाची सुटका करून हसनला बेदम चोप दिला. यादरम्यान घरी मुलगा दिसत नसल्याचे पाहून शोध घेत असलेल्या आईने रस्त्यावरील गर्दी पाहून गर्दीकडे धाव घेतली. तिथे आपलाच मुलगा रडत असल्याचे दिसले. मुलाशी गैरवर्तन झाल्याचे समजताच तिने पतीसोबत तत्काळ वडाळा टी टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक अमोल साळुंखे यांनी त्याच्यावर कारवाई केली.
अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:03 IST