शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 23:45 IST

Crime News : एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्यांना कुत्र्यावरून झालेल्या वादावरून बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. 

गुरुग्राम - अगदी किरकोळ कारणांवरून शेजाऱ्यांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. हरयाणामधील गुरुग्राम येथील एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्यांना कुत्र्यावरून झालेल्या वादावरून बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.   या कुटुंबातील एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या कुत्र्याला टॉमी या त्याच्या नावावरून न बोलावता कुत्रा म्हटल्याने हा शेजारी नाराज झाला आणि त्याने या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

ही घटना गुरुग्राममधील ज्योती पार्क येथे घडली आहे. त्याचे झाले असे की, या मारहाण करणाऱ्या शेजाऱ्याकडे असलेल्या कुत्र्यामुळे शेजारी राहणारे सुधीर नावाचे गृहस्थ त्रस्त होते. त्यांनी या कुत्र्याला साखळीने बांधून ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपल्या कुत्र्याला साखळीने बांधून ठेवायला सांगतात ही बाब या व्यक्तीला आवडली नाही. उलट आपल्या कुत्र्याचे टॉमी हे नाव न घेता त्याला कुत्रा म्हटले, त्यामुळे या व्यक्तीचा संताप अनावर झाला. त्यातून ही मारहाण घडली. 

सुधीर यांचे म्हणणे आहे की, हा कुत्रा चावा घेण्यासाठी अंगावर येत असल्याने त्यांनी या कुत्र्याला बांधून ठेवण्याची विनंती कुत्र्याच्या मालकाला केली होती. मात्र कुत्र्याला टॉमी म्हणण्याऐवजी कुत्रा म्हटल्याने कुत्र्याचा मालक नाराज झाला. त्याने सुधीर यांच्या कुटुंबीयांना काठी आणि रॉडने मारहाण केली. यात कुटुंबातील सहा जण जखमी झाले. त्यानंतर सुधीर यांनी गुरुग्राम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाJara hatkeजरा हटके