शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारातून तरुणीने दिला बाळाला जन्म; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 20:46 IST

Court : न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. 

ठळक मुद्देया खटल्यात सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. यात स्वत: पिडीत तरुणीची जबाब महत्त्वाचा ठरला.

जळगाव : जळगाव शहरातील २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केला. यातून ती गर्भवती व नंतर बाळाला जन्म दिला. लग्नास नकार दिला. याप्रकरणातील आरोपी जयकुमार अशोक सोनवणे (वय ३२, रा. खोटेनगर)  याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने आरोपीस दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

याबाबत सविस्तर घटना अशी की, जयकुमार याने २०११-१२ मध्ये शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका तरुणीशी जवळीक साधली. यानंतर २०१३-१४ मध्ये प्रेमसबंध प्रस्तापित करुन या तरुणीशी शरिससंबध ठेवले. तिला घरी, लॉजवर नेऊन अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली होती. तीने जयकुमार याला लग्न करण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु, त्याने लग्न केले नाही. अखेर २०१५ मध्ये या तरुणीने जयकुमारच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी जयकुमार याला अटक केली. दोन महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. दरम्यान, शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप सादर केलेे. न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. 

पीडितेची डीएनए चाचणी ठरली महत्त्वाचीया खटल्यात सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. यात स्वत: पिडीत तरुणीची जबाब महत्त्वाचा ठरला. तसेच पिडीता व जयकुमार यांची डीएनए चाचणी देखील उपयोगात आली. सुनावणीअंती न्यायालयाने जयकुमार याला दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.उपनिरीक्षक विजयमाला चव्हाण व वासुदेव मराठे यांनी तपास केला. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.

२०१६ मध्ये दिला मुलास जन्मया पिडीतीने सन २०१६ मध्ये मुलास जन्म दिला आहे. हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. जयकुमार याने पिडीतेशी लग्न न केल्यामुळे तीने मुलाचा सांभाळ केला आहे. दरम्यान, न्यायालयाने जयकुमार याला ठोठावलेली तीन लाख रुपयांची दंडाची रक्कम पिडीता व तीच्या मुलास संगोपनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी