शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वीज तार अंगावर पडून तरुणीचा मृत्यू; तुमसर तालुक्याच्या खरबी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 18:12 IST

Death Case : घटनेची माहिती तुमसर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी व मोहाडी पोलिस ठाण्याला देण्यात आली

ठळक मुद्देचित्रकला निरंजन बडवाईक(१८) असे मृत तरुणीचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे बडवाईक यांच्याकडे १८ मार्च रोजी लग्न समारंभ आहे.

खापा (भंडारा) : कपडे धुन्याकरिता कुटुंबियातील सदस्यांसोबत नाल्यावरील बंधाऱ्यावर गेलेल्या तरुणीच्या अंगावर जिवंत वीज तार पडून तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना तुमसर तालुक्यातील खरबी शेतशिवारात घडली. 

चित्रकला निरंजन बडवाईक(१८) असे मृत तरुणीचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे बडवाईक यांच्याकडे १८ मार्च रोजी लग्न समारंभ आहे. ऐनवेळी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे आनंदावर विरजण पडले आहे. तुमसर तालुक्यातील खरबी येथील रहिवासी असलेले बडवाईक कुटुंबीयांत १८ मार्च रोजी रोजी लग्नसमारंभ आहे. यासंदर्भात घराची स्वच्छता सफेदी व अन्य कार्य सुरू आहे. याच अंतर्गत रविवारी सकाळी बडवाईक कुटुंबियातील सदस्य कपडे धुण्याकरिता खरबी विहीरगाव मार्गावरील शेतशिवार लगतच्या नाल्यावर गेले होते. यावेळी बंधाऱ्याच्या पाळीवर कपडे धूत असताना नाल्यावरून गेलेल्या थ्रीफेज या विद्युत वाहिनीतील एक जिवंत तार कोसळून चित्रकला हिच्या अंगावर कोसळला पाहता पाहताच अवघ्या काही सेकंदातच चित्रकला ही त्या तारासोबत पाण्यात कोसळली. विद्युत च्या जबर धक्क्याने क्षणभरातच चित्रकलेची प्राणज्योत मालविली. होत्याचे नव्हते झाले. आरडाओरड करून सगळी गावकरी नाल्याच्या बंधाऱ्यावर जमली. चित्रकला ही मोहाडी येथील एका महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिक्षण घेत होती. चित्रकलाच्या मृत्यूने संपूर्ण गावातच शोकमग्न वातावरण निर्माण झाले. तिच्या मागे आई-वडील भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. तिच्या पार्थिवावर खरबी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची मोहाडी पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कुटुंबीयांना २० हजार रुपयांची मदत 

सदर घटनेची माहिती तुमसर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी व मोहाडी पोलिस ठाण्याला देण्यात आली. घटनास्थळी मोहाडी पोलिस व वीज वितरण कंपनीचे अधिकारी पोहोचले. पंचनामा करून चित्रकला हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी वीज वितरण कंपनीतर्फे बडवाईक कुटुंबियांना तात्काळ स्वरूपात २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मात्र वीज वितरण कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे एका तरूणीला नाहक जीव गमवावा लागला याची एकच चर्चा होती.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसelectricityवीज