शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:31 IST

इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली

इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर कोर्टाने एका मुलीला पॉक्सो कायद्यातंर्गत दोषी ठरवत तिला शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदाच पॉक्सो कायद्यानुसार एका युवतीला शिक्षा झाल्याची घटना आहे. अल्पवयीन मुलाचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप तिच्यावर होता. आरोपी युवतीचं वय १९ वर्ष आहे. आरोपीने बहाण्याने मुलाला दुसऱ्या राज्यात नेले. इथं मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु काहीच हाती लागले नाही. 

कुटुंबानुसार, आमचा मुलगा खूप दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला परंतु कुठेच तो सापडला नाही. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात धाव घेतली. बाणगंगा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याला इंदूरला परत आणले गेले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला. त्यात संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी युवतीला अटक केली. हे प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी होते त्यावर बुधवारी कोर्टाने निर्णय घेतला. इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलाच्या शारिरीक शोषणासाठी पहिल्यांदाच कोर्टाने एका युवतीला शिक्षा सुनावल्याची ही घटना आहे. 

नेमकं प्रकरण काय?माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला १९ वर्षीय मुलगी बहाण्याने फसवून त्याच्यासोबत घेऊन गेली होती. त्याठिकाणी तिने मुलाला कामाला लावले. या काळात मुलीने मुलाचं लैंगिक शोषण केले. तोपर्यंत कुटुंबाने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तात्काळ एक्शन घेत मुलाचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी युवतीला ताब्यात घेत कोर्टासमोर हजर केले. तिथे कोर्टाने मुलीविरोधात पुरावे पाहून तिला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपी युवतीला १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.  

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाCourtन्यायालय