शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीने नाकारल्याने जळगावात युवतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 04:16 IST

जात पंचायतीत घेण्यास संबंधितांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जळगाव : जात पंचायतीत घेण्यास संबंधितांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दुैवी घटना शुक्रवारी सकाळी शहरातील कंजरवाडा- सिंगापूर भागात उघडकीस आली. या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून या युवतीचा मृतदेह तब्बल १२ तास घरातच ठेवण्यात आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर हा प्रकार उघडकीस आला.मानसी आनंद बागडे असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे वडील आनंद बागडे हे राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी २० वर्षांपूर्वी परजातीय मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना मुली झाल्या. मानसीच्या आजोबांना हा विवाह मान्य नव्हता. कालांतराने पती- पत्नी विभक्त झाले. यानंतर आजोबांनी मुलगा आनंद याचे लग्न समाजातील एका महिलेशी लावून दिले. तेव्हापासून मानसीचे वडील दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. तर मानसीची आई दोन्ही मुलींसोबत कंजरवाड्यातच विभक्त राहत होती. इकडे मानसी आता वयात आली होती.तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे म्हणून काकांनी पुढाकार घेतला होता. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आले होते. मात्र, आजोबांनी तिला समाजात घेण्यास विरोध दर्शविला होता. विनवण्या करुनही त्यांनी विरोध कायम ठेवला. शेवटी हतबल होऊन तिने गुरुवारी दुपारी १२ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.मानसीचा मृत्यू हा डोक्यात ताप गेल्यामुळे झाला. नातेवाइकांची प्रतीक्षा करीत असल्यामुळे अंत्यसंस्काराला उशीर झाला त्यामुळे मृतदेह घरातच ठेवण्यात आला होता. - आनंद बागडे, मानसीचे वडील.वैद्यकीय अहवालानुसार, मानसी हिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जात पंचायतीमुळे या युवतीने आत्महत्या केल्याबाबत तक्रार आली आहे.- रणजीत शिरसाठ,निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्थानक, जळगावआजोबा व जात पंचायतीने जातीत घेण्यास विरोध केल्याने मानसी हिने आत्महत्या केली आहे. याशिवाय पंचायतीच्या पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी मानसीच्या आई-वडिलांकडून २० हजार रुपये दंड घेण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी.- कृष्णा इंद्रेकर,समाज नेते, वांद्रा मुंबई

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या