शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका बुक्कीतच... बॉक्सरच्या एका ठोशाने मोडली तरुणाची मान, जागेवरच तडफडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:39 IST

Crime News: एका बुक्कीतच हा संवाद देवमाणूस या मालिकेतील बजा या पात्राच्या तोंडून तुम्ही ऐकला असेल. मात्र प्रत्यक्षात एका बॉक्सरने किरकोळ कारणावरून मारलेल्या एका ठोशामुळे तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लंडन - एका बुक्कीतच हा संवाद देवमाणूस या मालिकेतील बजा या पात्राच्या तोंडून तुम्ही ऐकला असेल. मात्र प्रत्यक्षात एका बॉक्सरने किरकोळ कारणावरून मारलेल्या एका ठोशामुळे तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील नॉर्थ वेल्समध्ये पबमध्ये बसून मद्यपान करत असलेल्या एका बॉक्सरने तरुणाची ठासा मारून हत्या केल्याचे समोर आले आहे. या बॉक्सरने सदर तरुणावर एवढ्या जोरात ठोसा मारला की, त्याचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, पोस्टमार्टेम रिपोर्टमधून एक ठोसा सदर युवकासाठी कसा जीवघेणा ठरला याचा उलगडा झाला आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार २५ वर्षीय ब्रँडन सायलेंस नॉर्थ वेल्समधील एका पबमध्ये बसून मद्यपान करत होता. तेव्हा त्याने कुठलेही कारण नसताना २०  वर्षीय डीन स्किलिन याच्यावर हल्ला केला. मात्र बॉक्सर असलेल्या ब्रँडन याने केवळ एकच पंच मारला. मात्र हा एक पंच डीनसाठी जीवघेणा ठरला.  मिळालेल्या माहितीनुसार ब्रँडन याने डीन स्किलीनला मारलेल्या ठोश्यामुळे डीनचे डोके वेगाने फिरून मानेचे हाड मोडले. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर काही वेळातच डीन ब्रेन डेड झाला.

त्यानंतरत पोलिसांनी ब्रँडनला अटक केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोर्टासमोर हजर केले. तिथे जबाब देताना त्याने आपला हत्या करण्याचा हेतू नव्हता, असे सांगितले. मी केवळ भांडण सोडवण्यासाठी गेलो होते. एका पंचमुळे त्याचा मृत्यू होईल, असे मला वाटले नव्हते, असे तो म्हणाला.

ब्रँडनने पोलिसांना सांगितले की, हा पंच केवळ एक इशारा होता. मी आक्रमक नव्हतो. मी कुणालाही दुखापत करण्याचा प्रयत्न केला नाही. मी दोघांना मारले होते. तसेच हा ठोसा केवळ इशारा म्हणून दिला होती. त्यात एक जण जमिनीवर पडला, तर एकजण उभा राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रँडन हा काही प्रोफेशनल बॉक्सर नाही आहे. त्याने आपल्या जीवनात एकही फाईट खेळलेली नाही. मात्र त्या दिवशी त्याच्या एका बुक्क्याने डीन स्कीलिन याचे प्राण घेतले. 

टॅग्स :boxingबॉक्सिंगCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय