शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कॉल सेंटरमधून काम आटोपून घरी जाणाऱ्या तरुणास चाकूचा धाक दाखवून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 21:30 IST

Crime News : आधी एकाने लाईटर विचारले असता अमृत ने नाही सांगितले. दुसऱ्याने वेळ विचारली असता तो न बोलताच पुढे चालू लागला. त्यावेळी मागून एकजण आला आणि अमृतला पकडून चाकू दाखवून त्याच्या खिशातील २ मोबाईल बळजबरी काढून घेतले .

मीरारोड - कॉल सेंटरमध्ये काम आटोपून घरी जात असलेल्या तरुणास चाकूच्या धाकाने तिघा जणांनी लुटल्याचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला आहे. जबरी लुटीच्या घटना वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.मीरारोडच्या बेवर्ली पार्क भागात राहणारा अमृत तानावडे (२५) हा कासारवडवली येथील कॉल सेंटर मध्ये कामास आहे. काम आटोपून रविवारच्या मध्यरात्री त्याच्या मित्राने त्याला मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल येथे सोडले . घरी जाण्यासाठी तो पायी रस्त्याने चालत जात असताना सर्व्हिस मार्गावर तिघे तरुण बसले होते. आधी एकाने लाईटर विचारले असता अमृत ने नाही सांगितले. दुसऱ्याने वेळ विचारली असता तो न बोलताच पुढे चालू लागला. त्यावेळी मागून एकजण आला आणि अमृतला पकडून चाकू दाखवून त्याच्या खिशातील २ मोबाईल बळजबरी काढून घेतले . त्याचे पाकीट काढून घेतले असता अमृतने आतील ओळखपत्रे तरी द्या असे सांगितले असता पाकिटातील ५२० रुपयांची रोकड काढून पाकीट परत केले. तसेच एका मोबाईल मधील सिमकार्ड व मेमरी कार्ड सुद्धा परत करत तिघेही तेथून पसार झाले. या प्रकरणी १४ हजरांचे मोबाईल, रोख जबरी लुटल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. गेल्या आठवड्यात भाईंदर येथे एका रेल्वे पेन्ट्री कमर्चाऱ्यास पहाटे दोघांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिसmira roadमीरा रोड