लातूर : कत्ती, चाकूने सपासप वार करुन एका ३५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना लातुरातील सद्गुरुनगरात मंगळवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारस घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. गाेकुळ मंत्री असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पाेलिसांनी सांगितले, मयत गाेकुळ मंत्री हे आपल्या माेटारसायकलवरुन (एम.एच. २४ बी.ए. ४३३९) मंगळवारी तीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, त्यांच्या दुचाकीवर दाेन वीस ते बावीस वर्षीय दाेन तरुण प्रवास करत हाेते. दरम्यान, दाेघा तरुणांनी सद्गुरुनगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील परिसरात भर रस्त्यावरच गाेकुळ मंत्री यांच्या डाेक्यात, पाठीत आणि शरिरावर कत्ती, चाकू, धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गाेकुळ मंत्री यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह भेट देवून पंचनामा केला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.खुनाचे कारण अस्पष्ट...मंगळवारी दिवसाढवळ्या दाेघांनी गाेकूळ मंत्री या तरुणाचा कत्ती आणि चाकूने सपासप वार करत खून केला. घटनेनंतर दाेघे मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले. त्यांच्या अटकेसाठी पाेलीस पथक तैनात करण्यात आले आहे. हा खून नेमका काेणत्या कारणासाठी झाला, हे कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. तपासाअंती खुनाचे कारण समाेर येणार आहे, असेही पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी म्हणाले.
भरदिवसा कत्तीने वार करुन तरुणाची केली हत्या अन् मारेकरी झाले फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:16 IST
The young man was stabbed to death : साेबत असलेल्या दाेघांनीच केला हल्ला
भरदिवसा कत्तीने वार करुन तरुणाची केली हत्या अन् मारेकरी झाले फरार
ठळक मुद्दे गाेकुळ मंत्री असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.