शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

डीजेवर नाचताना धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:23 IST

लग्नसमारंभात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सशस्त्र गुंडांनी पाच जणांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देचार गंभीर जखमी : नागपूरच्या कळमन्यातील लग्नसमारंभात घडला थरार, पाहुण्यांची पळापळ, प्रचंड दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नसमारंभात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सशस्त्र गुंडांनी पाच जणांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कामठी मार्गावरच्या अमन लॉनमध्ये सोमवारी रात्री ११. ३० वाजता ही थरारक घटना घडली. निखिल हरिदास लोखंडे (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे.गोरेवाड्यातील रहिवासी विक्की सुनील डोंगरे (वय २८) हा त्याच्या एका मैत्रिणीच्या लग्नात सोमवारी रात्री काही मित्रांसह सहभागी झाला होता. लग्न समारंभ भरात आला असताना काही जणांनी डीजे सुरू केला. विक्की आणि त्याचे मित्र मैत्रिणी तसेच लग्नात सहभागी झालेले गुंड डीजेवर नाचू लागले. गुंडांपैकी एकाला विक्कीचा धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी विक्कीसोबत वाद घातला. भांडण वाढल्याने लग्न समारंभात गोंधळ निर्माण झाला. अनेक पाहुणे निघून गेले. काहींनी कसेबसे समजावल्याने आरोपी बाजूला गेले. त्यानंतर काही वेळाने विक्कीवर अचानक सात ते आठ आरोपींनी घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. ते पाहून विक्कीला वाचविण्यासाठी त्याचा मित्र निखिल लोखंडे, मोनू ऊर्फ निखिल कांबळे (रा. कुतुबशहा नगर), आकाश दिलीप लोखंडे (वय २८, रा. गोरेवाडा) आणि सोनू मोहन शाहू हे धावले. आरोपींनी त्यांच्यावर घातक शस्त्राचे घाव घातले. मानेवर घाव बसल्याने निखिल लोखंडेचा मृत्यू झाला. सिनेमातील एखाद्या हिंसक दृश्यासारखे आरोपी उपरोक्त तरुणांवर घाव घालत होते. त्यामुळे समारंभात एकच कल्लोळ निर्माण झाला. किंचाळ्या, आरडाओरडीमुळे समारंभात प्रचंड दहशत परसली. निखिल निपचित पडल्यानंतर आरोपी तेथून शिवीगाळ करीत पळून गेले. प्रचंड दहशतीत आलेल्या पाहुण्यांपैकी एकाने कळमना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. विक्कीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकाची हत्या आणि चार जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कलम ३०२, ३०७, १४३, १४५, १४७, १४९, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.आधीच लावून होते घातकळमना पोलिसांनी हे थरारकांड डीजे वर नाचताना धक्का लागल्यामुळे झाल्याचे सांगितले असले तरी या प्रकरणात मूळ कारण वेगळेच असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. आरोपी विक्की आणि निखिलवर ‘नाजूक’ कारणामुळे घात लावून होते. विक्की या लग्नात सहभागी होणार, याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते तयारीनेच आले होते. कटकारस्थान करूनच त्यांनी हे हत्याकांड घडवून आणल्याची चर्चा आहे. दरम्यान, कळमन्याचे सहायक निरीक्षक राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रात्रीपासून धावपळ करीत तीन आरोपींना ताब्यात घेतले. शुभम सिद्धी सोनी (वय २३) त्याचा मोठा भाऊ मनोज सोनी (वय २५) आणि राहुल बब्बूसिंग भाटी (वय २३) अशी त्यांची नावे आहेत.मोकाट गुंडांमुळे घडले थरारकांडकळमना परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. परिणामी गुंड मोकाट सुटले आहेत. रात्रीच नव्हे तर दिवसाही लुटमारीच्या घटना घडतात. ऑटो आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारांच्या दोन गटात वाद आहे. त्यांच्यातील हाणामारी, खंडणी वसुली अन् वर्चस्वाचा वाद सर्वत्र चर्चेचा विषय असताना कळमना ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. ठाण्यातूनच अनेक प्रकरणात परस्पर गुन्हेगाराला मोकळे केले जाते. दरम्यान, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुंड मोकाट सुटल्याने कळमन्यात कोणताही मोठा गुन्हा घडू शकतो, ही भीती यापूर्वी लोकमतने व्यक्त केली होती. ती अखेर खरी ठरली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शुभम सोनी हा खतरनाक गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही प्राणघातक हल्लयाचे अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्यावर जरब नसल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने निखिलची हत्या केली तर अन्य चार जणांना गंभीर जखमी केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर